अमेरिकेच्या दोन विमानांची हवेत टक्कर-5 नौसैनिक बेपत्ता

टोकियो (जपान): अमेरिकेच्या दोन विमानांची हवेत टक्कर होऊन पाच नौसैनिक बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जपानच्या इवाकुनी मरीन कोअर एयर स्टेशनवरून या दोन्ही विमानांनी उड्डाण केले होते. एफ/ए-18 आणि केसी-130 हर्क्‍युलस ही दोन विमाने हवेतल्या हवेत इंधन भरण्याचे नित्यक्रमाचे काम करत असताना एकमेकांवर धडकली. या दोन्ही विमानात मिळून 7 नौसैनिक होते. त्यापैकी दोन नौसैनिकांना वाचवण्यात आल्याचे आणि बाकी पाच जणांचा शोध चालू असल्याचे जपानच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितले आहे.

आमचे संपूर्ण लक्ष पाच नौसैनिकांचा शोध घेण्यावर केंद्रीत आहे. या बाबतची सर्व माहिती हाती आल्यानंतरच जपान या दुर्घटनेबाबत काही टिप्पणी करील असे जपानचे संरक्षण मंत्री ताकेशी इवाया यांनी म्हटले आहे. मदत कार्यात जपानने दाखवलेल्या तत्परतेबद्दल अमेरिकेचे राजदूत विल्यम हेगर्टी यांनी जपान सरकारचे आभार मानले आहेत.

-Ads-

अलीकडच्या काही वर्षांत अमेरिकन लष्कराच्या हवाई दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सन 2013 ते 2017 या काळात हवाई दुर्घटनांमध्ये 40 टक्के वाढ झाली असून किमान 133 लष्करी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. लष्कराच्या आधुनिकीकरणावर लक्ष न दिल्यामुळे दुर्घटनांमध्ये वाढ झाल्याचे अमेरिकन खासदारांचे म्हणणे आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)