२६/११ : मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अमेरिकेकडून ३५ कोटींचे बक्षीस

मुंबई – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास आज दहा वर्ष पूर्ण  होत आहे. या दशवर्षपूर्तीनिमित्त ट्रम्प प्रशासनाने मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 35 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ सांगितले कि, मुंबई हल्ल्याचे मुख्य सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना पकडण्यासाठी अमेरिकेकडून ५० लाख डॉलर म्हणजेच ३५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच या हल्ल्यातील शहिदांना अमेरिकेकडून श्रध्दांजली वाहण्यात आली.

-Ads-

दरम्यान, मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने १६६ नागरिक पडले होते. यामध्ये ६ परदेशी नागरिकांचाही समावेश होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)