उर्वशी रौतेला बनली सॅंटाक्‍लॉज

सगळीकडे ख्रिसमसची धूम सुरु आहे. “बिग बॉस 12’च्या घरामध्येही ख्रिसमस साजरा करण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. या घरामध्ये घरातल्या सर्व स्पर्धक सदस्यांना भेटवस्तू देण्यासाठी चक्क सांताक्‍लॉजही येणार आहे. हा सांताक्‍लॉज बनून येणार आहे चक्क उर्वशी रौतेला. ती सर्व स्पर्धकांना खास गिफ्टही देणार आहे. दीपिका, सुरभि आणि श्रीसंत यांना त्यांच्याच निकटवर्तीयांनी पाठवलेल्या वस्तू उर्वशी देणार आहे.

सर्व सदस्यांना गिफ्ट वाटल्यानंतर उर्वशी बनलेला सांताक्‍लॉज सर्वांना गाणी म्हणण्यास आणि त्यावर परफॉर्म करायला सांगणार आहे. नुकतेच “बिग बॉस’च्या सेटवर “सिंबा’ची टीम प्रमोशनसाठी आली होती. त्यामध्ये रणवीर सिंह, सारा अली खान आणि रोहित शेट्टीही होते. “सिंबा’मधील “आंख मारे’ या गाण्यावर रणवीर सिंहने साराच्या बरोबर परफॉर्मन्सही केला होता. त्याशिवाय “निग बॉस’च्या घरातील सर्व सदस्यांबरोबर तो भरपूर गेम्सही खेळला होता. त्याच प्रमाणे ख्रिसमसच्या निमित्ताने होणारी ही धम्मालही खूप मनोरंजक असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या एपिसोडमध्ये लाल टोपी, डगला आणि दाढी मिशा लावलेली उर्वशी रौतेला सांताक्‍लॉजच्या रुपात कशी दिसणार आहे, याची उत्सुकता आता “बिग बॉस’च्या प्रेक्षकांमध्ये लागून राहिली असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)