उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरणही राजकीय झाले आहेत. अशावेळी रोज नवेनवे प्रसिद्ध चेहरे पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनेही आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षातर्फे उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईची जागा लढवू शकते. उत्तर मुंबई या जागेवरून निवडणुकीस उभे राहण्यास बिग बॉस फेम शिल्पा शिंदे आणि आसावरी जोशीही इच्छूक आहेत. तर भाजपने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here