उर्मिला मातोंडकरचा ‘हा’ मतदारसंघ ठरला 

नवी दिल्ली – बॉलीवूडमधील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. राजधानी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलाने पक्षप्रवेश केला. कॉंग्रेसकडून उर्मिला उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

उत्तर मुंबईतून भाजपने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कॉंग्रेस शेट्टींविरोधात एका तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. त्यामुळेच उर्मिलाला उमेदवारी देण्यात आल्याचा कयास लावण्यात येत आहे. याआधी कॉंग्रेसकडून याठिकाणी आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांचीही नावे चर्चेत होती.

दरम्यान, गुरुवारी एका वृत्तवाहिनीवरून उर्मिलाने भाजपवर टीकास्त्र डागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)