प्रचारासाठी उर्मिला मातोंडकर क्रिकेटच्या मैदानात 

मुंबई-  सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच रंग चढला असून, उमेदवार सुद्धा मतदारांना आपलेसे करण्यासाठी वेगवेगळे फंडे आजमावून पाहत आहे. त्यातच आज उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी हटके प्रचार केला आहे.

प्रचारासाठी उर्मिला मातोंडकर क्रिकेटच्या मैदानात

सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच रंग चढला असून, उमेदवार सुद्धा मतदारांना आपलेसे करण्यासाठी वेगवेगळे फंडे आजमावून पाहत आहे. त्यातच आज उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी हटके प्रचार केला आहे.सविस्तर बातमी.. https://bit.ly/2UUqhV3

Posted by Dainik Prabhat on Sunday, 14 April 2019

आज, कांदिवलीत चारकोपमधील सह्याद्री नगरच्या मैदानावर उर्मिला मातोंडर स्थानिकांसोबत क्रिकेट खेळल्या. सध्या प्रचाराच्या धावपळीत आयपील बघायला पुरेसा वेळ मिळत नसल्याने स्थानिकांनसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. असं ट्विट सुद्धा उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या ट्विटर आकाउंट वर केले आहे. यावेळी उर्मिला यांनी मतदारांच्या मनावर भावनिक साद घालत ‘ आपली मुंबईची मुलगी ‘ असा हॅशटॅश त्यांनी वापरला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)