काँग्रेसच्या तिकिटावर उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात?

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरणही राजकीय झाले आहेत. अशावेळी रोज नवेनवे प्रसिद्ध चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या चर्चा सध्या जोरदार चालू आहे. यामध्येच आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकरही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षातर्फे उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईची जागा लढवू शकते.

उत्तर मुंबई या जागेवरून निवडणुकीस उभे राहण्यास बिग बॉस फेम शिल्पा शिंदे आणि आसावरी जोशीही इच्छूक आहेत. तर भाजपने विद्यमान खासदार याना पुन्हा एकदा संधी दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अनेक कलाकार आणि खेळाडूंना संधी दिली आहे. काँग्रेसही कलाकार आणि दिग्गजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. याआधीही डान्सर सपना चौधरी काँग्रेसमध्ये सामील झाली आणि निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, सपना चौधरीने हे वृत्त फेटाळून लावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)