संसदीय समितीपुढे उर्जित पटेल यांची उपस्थिती 

नोटबंदी, एनपीए संबंधात दिली माहिती 

नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज संसदेच्या समितीपुढे उपस्थित राहुन नोटबंदी आणि एनपीए म्हणजेच बॅंकांचे बुडित कर्ज आणि बॅंकांची एकूण आर्थिक स्थिती याविषयी माहिती दिली. संसदेची अर्थविषयक स्थायी समिती ही एकूण 31 सदस्यांची आहे. त्यावेळी उपस्थित सदस्यांनी त्यांना बॅंकांच्या एकूण आर्थिक स्थितीविषयी सर्वंकष प्रश्‍न विचारले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली हेही या समितीचे सदस्य आहेत.

दरम्यान या समितीपुढे उर्जित पटेल यांनी नेमकी काय माहिती दिली त्याचा तपशील मात्र जाहीर झालेला नाही. नोटबंदीनंतर बॅंकांच्या आर्थिक स्थितीवर बराच परिणाम झाला आहे. तसेच अब्जावधी रूपयांची बॅंकांची कर्जे बुडाल्यामुळे अनेक राष्ट्रीयकृत बॅंकांची स्थिती नाजूक बनली आहे त्यामुळे त्याच विषयावर बहुसंख्य सदस्यांनी त्यांच्याकडून माहिती घेतली असे सांगण्यात येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)