उर्जित पटेल यांना पद सोडण्याची गरज पडणार नाही 

नवी दिल्ली – केंद्र सरकार रिझर्व्ह बॅंकेबरोबरील आपला वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. रिझर्व्ह बॅंकेबरोबर केंद्र सरकारचे पूर्वीही वाद झाले आहेत. यासाठी गव्हर्नर उर्जित पटेल यांना पद सोडण्यास सांगणार नाही, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. सरकारमधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेत मतभेद होणे नवीन बाब नाही.

भूतकाळात अनेक सरकारांबरोबर असे प्रसंग घडले आहेत. एका अधिकाऱ्याने म्हटले की, उर्जित पटेल यांचा कार्यकाळ पुढील वर्षी ऑगस्टमध्ये संपणार आहे. आरबीआय अणि सरकार यांच्यातील मतभेद 10 दिवसांपूर्वी सार्वजनिक झाले. त्यामुळे पटेल यांच्या भवितव्याबाबत चर्चा रंगली होती. गेल्या बुधवारी आरबीआयच्या कलम 7 चा सरकारकडून वापर होणार असल्याची चर्चा रंगल्यानंतर पटेल पद सोडून जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर सरकारने त्वरित आरबीआयच्या स्वायतत्तेवर जोर देत दोन्ही पक्ष सार्वजनिक हित आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काम करत असल्याचे निवेदन प्रसिद्ध केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)