इम्रान खानचे भारतासमोर लोटांगण, चर्चेतून तोडगा काढण्याची भारताकडे याचना

इस्लामाबाद: भारतीय वायुसेनेच्या कारवाईत सुमारे ३०० दहशतवादी मारले गेले आहेत. पाकिस्तानमध्ये घुसून भारताने ही कारवाई केली. या महान ऑपरेशनसाठी भारतीय वायुसेनेला १२ मिराज लढाऊ विमानांचा वापर केला. यामध्ये जैश-ए-मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाले. तसेच बालाकोट, चाकोथी आणि मुजफ्फरबाद लॉन्च पॅड पूर्णपणे नष्ट झाले.

दरम्यान, पाकिस्तानने जम्मू-काश्मीर सीमेवर युद्धबंदीचा भंग केला आहे आणि जोरदार गोळीबार केला जात आहे. तसेच भारतीय वायुसेनेच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी लष्कराचे लढाऊ विमान आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करत भारताच्या हद्दीत घुसले आहे. तर भारताच्या वायुसेनेनेही त्यांना चोख प्रत्युत्तर देत पाकची विमाने परतवून लावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या तणावाच्या वातावरणात बिथरलेल्या पाकिस्तानने आता भारतासमोर लोटांगण घेत चर्चेतून तोडगा काढण्याची भारताकडे याचना केली. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ही याचना केली. इम्रान खान म्हणले ‘जर युद्ध झाला तर ते माझ्या किंवा नरेंद्र मोदींच्या नियंत्रणात नाही. आपण दहशतवादावर कोणत्याही प्रकारचे वार्तालाप करायचे असेल तर आम्ही तयार आहोत. समजदारी दाखवणे आवश्यक आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)