राहुल गांधींना केरळातून निवडणूक लढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून आग्रह

केरळ : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळातून निवडणूक लढवावी यासाठी केरळ काँग्रेसचे पदाधिकारी त्यांची मनधरणी करीत असल्याचे वृत्त आहे. याबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ओमन चांडी यांनी माहिती दिली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, “केरळमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केरळातील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला असून राहुल गांधी याबाबत सकारात्मक निर्णय देतील असा आम्हाला विश्वास आहे. मी स्वतः वायनाड येथील पक्षाच्या संभाव्य उमेदवारांशी चर्चा केली असून तो राहुल गांधी यांच्यासाठी हा मतदारसंघ स्वखुशीने सोडण्यास तयार आहे.”

दरम्यान, सी-व्होटर नामक एका नामांकित सर्वेक्षण कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रसिद्धी दाक्षिणात्य राज्यांमध्ये सर्वात कमी असल्याचे दिसते. या आकडेवारीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तामिळनाडूतील प्रसिद्धी केवळ २.२% तर केरळमध्ये ७.७% असल्याचे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दाक्षिणात्य राज्यांच्या दौऱ्यावर असताना त्यांच्याविरोधामध्ये समाजमाध्यमांमध्ये #MODIGOBACK हा टॅगदेखील ट्रेंडिंग झाला होता.

आता याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना केरळमधून निवडणूक लढवावी यासाठी आग्रह करण्यात येत आहे.

https://twitter.com/ANI/status/1109392713214885888

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)