संघ लोकसेवा आयोग – कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसच्या 414 पदासाठी भरती

नवी दिल्ली – संघ लोकसेवा आयोगाने युपीएसी कम्बाइन्ड सर्व्हिसेस (CDS-II 2018) साठी पदांच्या भरती साठी नोटीफिकेशन जाहीर केले आहे. एकूण 414 पदाच्या जागेसाठी भरती असणार आहे.  कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिस पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर आहे. एकूण 414 पदांमध्ये इंडियन मिलिट्री अॅकडमी, (देहरादून)एकूण पद 100, इंडियन नेवल अॅकडमी(एझिमला) पद45, एअर फोर्स अॅकडमी (हैद्राबाद) पद 32, आॅफिसर्स ट्रेनिंग अॅकडमी (चेन्नई,पुरुष) पद 225, आॅफिसर्स ट्रेनिंग अॅकडमी (चेन्नई, महिला) पद 12 अशी पदसंख्या आहे.

-Ads-

अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे जरूरीचे आहे. सर्व पदांसाठी वेगवेगळी योग्यता ठरविण्यात आलेली आहे. संबंधित पदांच्या अधिक माहितीसाठी संघ लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in पहावे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)