यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी अर्जास सुरुवात

पुणे – यावर्षी तब्बल 896 जागांसाठी संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरीसेवा पूर्व परीक्षा 2019साठी अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2019 असून पूर्व परीक्षा 2 जून 2019 रोजी होणार आहे.

संघ लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि वर्ग 1 साठी नागरीसेवा परीक्षा घेण्यात येते. मागील वर्षीपेक्षा यावर्षी जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. परीक्षेस पात्रतेच्या अटी आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आहेत. उमेदवारांनी www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)