अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स

सदैव सर्वोत्तम…. रूग्णसेवा हे ब्रीदवाक्‍य घेऊन साई अमृत हॉस्पिटलची रूग्णसेवा अविरतपणे सुरू आहे. सर्व प्रकारच्या उपचार कॉस्ट इफेक्‍टिव्ह करण्याचे हॉस्पिटलचे सतत प्रयत्न सुरू असतात. हॉस्पिटलमध्ये जेवढ्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत, तेवढ्यावर समाधान न मानता तंत्रज्ञान आणि स्वत:चं तांत्रिक ज्ञान वाढवण्याचा साई अमृत प्रयत्न करत आहेत. उत्कृष्ट टीमवर्कचं उदाहरण म्हणूनच आज साई अमृतची सातारकरांसमोर नवी ओळख निर्माण होत आहे. गंभीर आजारांवरच्या उपचारांनासुध्दा सातत्यानं यश येतयं हीच येथील टीमची ताकद आहे. सगळ्याच शाखामधील स्पेशालिस्ट एकत्र आल्याने 80 टक्‍के आजारांवर आज इनहाऊस उपचार होत आहेत.

पुणे-मुंबईसारख्या शहरात उपचारांसाठी जेवढा खर्च येतो, त्याच्या 50 टक्‍के खर्चात थ्री-टायर आयसीयूसारख्या सुविधा आज रूग्णांना उपलब्ध करून देत आहे. साई अमृतच्या ज्ञानाचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळवून देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. पायाभूत संरचनेची गरज आहे, असं वाटल्यानंतर या हॉस्पिटलची उभारणी केली आणि आता ते स्वप्न साकार झालं. रूग्णांची संख्या जशी वाढतेय, त्याचप्रमाणे आजारांमधील गुंतागुंतही वाढत चालली आहे. अशा कॉम्प्लिकेशन मॅनेज करण्यासाठी जास्तीत जास्त तज्ञ मनुष्यबळ आणि जास्तीत जास्त तंत्रज्ञ एका छताखाली आणण्याचा साई अमृत हॉस्पिटलचा प्रयत्न होता आणि त्यातला एक मोठा टप्पा आज साई-अमृतने गाठला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“थ्री-टायर आयसीयू
हॉस्पिटलमध्ये पूर्वी 19 बेडचा आयसीयू होता. तो आता 20 बेडचा करण्यात आला आहे. श्री-टायर आयसीयू सुविधेचा सातारकरांना प्रथमच लाभ मिळत आहे. एबीजी मशीन,
बायोकेमिस्ट्री, टीडी इको कार्डिओग्राफी, टीईई, ब्रॉंकोस्कोपी, पक्‍युटेनस, टॅकिऑस्टॉमी, ऍडव्हान्स व्हेन्टिलेटर्स अशा सगळ्या सुविधा पेशंटना बेडसाईड स्वरुपात मिळू लागल्या आहेत. कार्डिऍक आणि इतर पेशंटसाठीचे आयसीयू स्वतंत्र आहेत. कार्डिऍक आयसीयू म्हणजे सीसीयूतल्या पेशंटचं स्वतंत्र मॉनिटरिंग या ठिकाणी केलं जातं. आयसीय मनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचे असून, थोडे जरी दुर्लक्ष झालं तरी पेशंटच्या जीवावर बेतू शकते, हे लक्षात घेऊन हॉस्पिटलमध्ये कायमस्वरुपी दोन कन्सल्टंट 24 तास हजर असतील, अशी व्यवस्था केली आहे. हॉस्पिटलमध्ये ऍनस्थेशियालॉजिट आणि इन्टेन्सिव्हिस्ट 24 तास उपलब्ध असतात.

तज्ञांकडून शस्त्रक्रिया
पोटाच्या शस्त्रक्रिया ऍडव्हान्स शस्त्रक्रिया, हार्निया किंवा कोलेसिस्टेक्‍टोमीसारख्या गुंतागुंताच्या शस्त्रक्रिया लेप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीच्या साह्याने इथ केल्या जातात. या खेरीज सुप्रोमेजर सर्जरी कोलेस्टोमी, ऍब्डॉमेनल सर्जरी, इस्केमिबॉइल, पॅंक्रायटिक सर्जरी आणि सर्व प्रकारच्या कॅन्सर सर्जरी म्हणजे सगळ्या ओपन सर्जरी इथे अत्यंत कुशलपणे केल्या जात आहेत. ब्रेन ट्यूमर, ब्रेन हॅमरेज, हाय रिस्क ऑब्टसेटिक सर्जरी आणि मेंदूच्या अन्य शस्त्रक्रियाबरोबर प्लास्टिक सर्जरी, युरोलॉजी, व्हॅस्कुलर, जॉईंट रिप्लेसमेंट, ऑथोर्पेडिक जॉईंट सर्जरी, मॅक्‍झिलोफेशियल सर्जरी अशा सगळ्या सर्जरी इथं तज्ञ डॉक्‍टरांकडून केल्या जातात.

कॉर्डिओलॉजिस्ट 24 तास उपलब्ध होऊ शकतात
साई-अमृत हॉस्पिटलमध्ये कॉर्डिओलॉजिस्ट 24 तास उपलब्ध होऊ शकतात. पेशंटला हार्ट ऍटॅक आलाय, हे स्पष्ट झाल्यानंतर कोणत्याही वेळी त्याची अँजिओग्राफी आणि पामी म्हणजे प्रायमरी अँजिओप्लास्टी करणं या सेवेमुळे शक्‍य झाले आहे. हार्ट ऍटॅकच्या केसेसमध्ये लवकर ट्रिटमेन्ट सुरू झाली, तर हृदयाचे जास्तीत जास्त स्नायू बचावतात.
हृदयाचे डॅमेज़ कमी होतं. कार्डिओलॉजिस्ट वेळेवर उपलब्ध नसला तर नुकसान वाढू शकतं. या सर्व बाबी हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजिस्टमुळे टळू लागल्या आहेत. अँजिओप्लास्टी करताना जेव्हा कॅल्शियमचे ब्लॉक आढळतात, तेव्हा ते साध्या स्टेन्टंन ओपन होत नाहीत. बबलच्या साह्याने ते फुटत नाहीत. असे कॅल्शियम ब्लॉक फोइन व्हेन ओपन करण्यासाठी रोटा अँब्लेशन अँड अँजिओप्लास्टी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान साई-अमृत हॉस्पिटलमध्ये आम्ही उपलब्ध केलं आहे.

लेफ्टमेन ब्लॉकसाठी अँजिओप्लास्टी
बायफर्केशन ब्लॉकसाठी बायफरर्केशन स्टेटिंग अँजिओप्लास्टी आणि जो सगळ्यात मोठा हार्ट ऍटॅक मानला जातो. त्या लेफ्टमेन ब्लॉकची अँजिओप्लास्टी इथे केली जाते. हृदयाच्या झडपा खुल्या करण्यासाठी बलून मायट्रल व्हॉलव्होटॉमीची सोय साताऱ्यात इथे सर्वप्रथम करण्यात आलीय. या उपचारासाठी परजिल्ह्यांमधूनच नव्हे तर परराज्यातून सुध्दा आता पेशंट साताऱ्याला येऊ लागलेत. हृदयाच्या हालचालीच क्‍लिअर व्हिज्युअल मिळावं, यासाठी ट्रान्स इसोफेजियल इको कार्डिओग्राफीची सोयही इथं उपलब्ध करण्यात आली आहे.

“चेस्ट पेन सेंटर
गंभीर आजारांमध्ये लोक सगळ्यात जास्त घाबरतात हृदयविकाराला, साई-अमृत या रग्णालयात छातीत दुखतंय, अशी तक्रार घेऊन एखादा पेशंट इथं आला तर तो हृदयविकारच ! आहे का, याची खातरजमा करून घेण्यासाठी इथे ‘चेस्ट पेन सेंटर’ उभारण्यात आलं आहे. हृदयविकाराच्या बाबतीत आवश्‍यक असलेली ट्रिटमेन्ट वेळेत मिळाली नाही तर ते घातक ठरू शकते; पण त्याबरोबरच केवळ शंका आहे, म्हणून अनावश्‍यक ट्रिटमेन्ट दिली जाणार नाही याचीही काळजी चेस्ट पेन सेंटर’च्या माध्यमातून घेतली जाते. चेस्ट पेजच्या पेशंटला थेट ऍडमिट करून न घेता, अडमिंटच्या आधी पहिल्या दहा मिनिटांत त्याचा इसीजी काढला जातो. टूडी इको केली जाते. त्याखेरीज रक्ताच्या तपासण्या आणि आवश्‍यकतेनुसार सगळ्या तपासण्या एका तासात पूर्ण केल्या जातात. घाबरण्यासारखं काही नसेल, तर पेशंट तासाभरात घरी जातो, जर त्याला हार्ट ऍटॅक आलाय, हे स्पष्ट झालं तरच त्याला अडमिट केले जाते.

लेफ्टमेन ब्लॉकसाठी अँजिओप्लास्टी
बायफर्केशन ब्लॉकसाठी बायफरर्केशन स्टेटिंग अँजिओप्लास्टी आणि जो सगळ्यात मोठा हार्ट ऍटॅक मानला जातो. त्या लेफ्टमेन ब्लॉकची अँजिओप्लास्टी इथे केली जाते. हृदयाच्या झडपा खुल्या करण्यासाठी बलून मायट्रल व्हॉलव्होटॉमीची सोय साताऱ्यात इथे सर्वप्रथम करण्यात आलीय. या उपचारासाठी परजिल्ह्यांमधूनच नव्हे तर परराज्यातून सुध्दा आता पेशंट साताऱ्याला येऊ लागलेत. हृदयाच्या हालचालीच क्‍लिअर व्हिज्युअल मिळावं, यासाठी ट्रान्स इसोफेजियल इको कार्डिओग्राफीची सोयही इथं उपलब्ध करण्यात आली आहे.

आयसोलेशन चेम्बर खास वैशिष्ट्य 
* पूर्वी स्वाईन फ्लूचे पेशंट, एआरडीएसचे पेशंट, त्याचप्रमाणे मल्टी ऑर्गन डिस्फंक्‍शन, रेजिस्टंट शॉक असे पेशंट मोठ्या शहरामध्ये पाठवावे लागत होते. त्यांच्यावर आता साताऱ्यातच उपचार केले जात आहेत.
* संसर्गजन्य आजार असलेल्या पेशंटपासून त्याच्या नातेवाईकांना होऊ शकणारी लागण रोखण्याचे कामही हॉस्पिटल करीत आहे. त्यासाठी आयसोलेशन चेम्बर तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून रूममध्ये पॉझिटिव्ह प्रेशर तयार करून इन्फेक्‍शन टाळण्यास हॉस्पिटलला यश मिळाले आहे.
* अत्याधुनिक कॅथलॅब
कॉम्प्लिकेशन रेट कमी करण्यासाठी आणि पेशंटची जलद रिकव्हरी होऊन त्याला लवकर आराम पडण्यासाठी ट्रान्स रेडिअल अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी इथं केली जाते. अत्याधुनिक कॅथलॅब हे साई अमृतचं आणखी एक वैशिष्ट्य ठरलं आहे. फिलिप्स कंपनीची 120 केव्हीची सीलिंग माउंटेड फ्लॅट पॅनेल कॅथलॅब साताऱ्यात प्रथमच इथं उपलब्ध झाली आहे.

1. साई-अमृत हॉस्पिटलमध्ये अवघड आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे निर्जंतूक वातावरणात करण्यासाठी दोन अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स तयार करण्यात आली आहेत.
2. ऑपरेशन थिएटर निर्जंतुक करण्यासाठी सामान्यतः फ्युमिगेशन केल जातं. आणि त्यानंतर 24 तासांनी ओटी उघडली जाते. ओटी बंद ठेवणं शक्‍य नसतं. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये निर्जंतुकीकरणासाठी फॉगर तंत्रज्ञान वापरले जाते.
3. या प्रक्रियेनंतर चार तासांनी ओटी वापरता येते. साध्या ओटीमध्ये दरवाजा उघडल्यास इन्फेक्‍शन रेट वाढतो. परंतु इथल्या मॉड्युलर ओटीमध्ये लॅमिनार फ्लो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्जंतुक हवा फेकली जाते.
4. साधारणतः सांधेपणा किंवा कोणत्याही ऑथोर्पेडिक सर्जरीसाठी जास्तीत जास्त निर्जंतुक वातावरण गरजेचं असतं. बायपास सर्जरीसाठीसुध्दा ते अत्यावश्‍यक असतं.
5. त्यासाठी पॉझिटिव्ह प्रेशर निर्माण करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. रेग्युलर फ्युमिग्रेशन केली जाणारी ओटी सर्वसाधारण पेशंटसाठी वापरली जाते आणि सेप्टिक पेशंटसाठी म्हणजे इन्फेक्‍टेड स्वतंत्र ओटी आहे.
6.ऑपरेशन थिएटरची वैशिष्ट्य सांगताना येथील ऍनस्थेशिया युनिटचा उल्लेख आवर्जुन करायला हवा. पेशंटच्या कम्फर्ट लेव्हलनुसार ऍनेस्थेशिया देण्यासाठी वर्क स्टेशनची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऍनस्थेशियाच्या ऍडव्हान्स प्रोसिजर्स तर इथं उपलब्ध आहेतच. शिवाय, ब्रेन किंवा स्पाईन सर्जरीसाठी, गंतागुंतीच्या टिश्‍यू सर्जरीसाठी मायक्रोस्कोपसुध्दा उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)