राज्यातील आगामी निवडणुका ‘एमआयएम’ आणि ‘भारिप’ एकत्र लढणार

अौरंगाबाद – राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम याच्यांत युती झाली आहे. दोघांनीही आगामी निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी दिली आहे.

गांधी जयंतीला म्हणजेच 2 आॅक्टोबरला एमआयएमचे अध्यक्ष ‘असदुद्दीन अोवेसी’ आणि ‘प्रकाश आंबेडकर’ यांच्यामध्ये युतीची बैठक होणार आहे. याआधी युतीबाबत प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी दोन बैठका झाल्या आहेत.

प्रकाश आंबेडकर या युतीचे नेतृत्व करणार असल्याचे समजते आहे. अहमदनगर महापालिकेत युतीचा पहिला प्रयोग केला जाणार असून भारिप आणि एमआयएम एकत्र लढणार आहेत. या नव्या समीकरणामुळे राज्यातील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
5 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)