युपीचा तमिल थलयवाजला पराभवाचा धक्का 

प्रो कबड्डीच्या सहाव्या सत्राची सुरुवात खूप थाटामाटात झाली. दुसर्या दिवशी दुसऱ्या  सामन्यात तमिल थलयवाज  आणि युपी योद्धा यांच्यात सामना झाला.   हा सामना युपीने ३७-३२ असा जिंकला.  युपीसाठी कर्णधार रिशांक देवाडिगा, प्रशांत राय, श्रीकांत जाधव आणि नरेंदर यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. तमिलचा कर्णधार अजय ठाकूरचे सुपर टेन या सामन्याचे  वैशिट्य ठरले.

सामन्याच्या सुरुवातीपासून युपीने  आपला दबदबा कायम राखला. प्रथम त्यांनी १० -० अशी आघडी घेतली.  त्यातून तमिल थलयवाज  सावरलेच नाही. १० व्या मिनिटाला तमिल थलयवाजचा संघ ऑल आऊट झाला आणि युपीची बढत १०-० अशी झाली. प्रो कबड्डीच्या इतिहासातील दुसरी सर्वात खराब सुरुवात १२-० अशी स्थिती तमिल संघावर ओढवली. पहिले सत्र संपले तेव्हा सामना १८-४ असा युपीच्या बाजूने होता.

दुसर्या सत्रात तमिल संघाने आपला खेळ उंचावला. त्यांनी प्रथम आपल्या चुका कमी केल्या आणि विरोधी संघाला चुका कारण्यास भाग पडले. त्यांतर अजय ठाकूरने जबरदस्त कामगिरी करत युपीला ऑल आऊट करण्यात मोठा वाटा उचलला आणि सामना २८-१९ अश्या स्थितीत आणला. शेवटच्या १०मिनिटात युपीचा संघ आपली बढत  कायम ठेवण्यावर भर देत होता तर तमिल  उलटफेर करण्याच्या इराद्याने झुंज देत होता.

सामना संपण्यास ६ मिनिटांचा खेळ शिल्लक होता तेव्हा युपीच्या प्रशांत रॉयने  आपल्या कौशल्याचे प्रदर्शन कारणानं २ गुण  मिळाले. त्यानंतर गुणसंख्या ३१-१९ अशी झाली.  तमिल संघाने हार न मानता  प्रयन्त सुरु ठेवले.परंतु, त्यांच्या पदरी निराशा आली आणि त्यांना ३७-३२ असे पराभूत  व्हावे लागले. तमिल कडून अजय ठाकूर आणि मनजीत चिल्लर यांनी उत्तम कामगिरी केली परंतु अन्य स्टार खेळाडू जसवीर सिंग, दीपक हुड्डा यांना  निराशा केली. तर युपीच्या सर्व खेळाडूंनी चांगला खेळ करत सांघिक कामगिरीच्या जोरावर सामना आपल्या नावे केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)