उत्तरप्रदेश काँग्रेसकडून प्रवक्तेपदासाठी लेखी परीक्षा

लखनऊ : उत्तरप्रदेश मध्ये काँग्रेसकडून प्रवक्तेपदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. त्याबरोबर
राज्यात नवीन मिडिया कम्युनिटीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. लखनऊ मधील युपीसीसीच्या कार्यालयात 65 जणांनी ही परीक्षा दिली. या उमेदवारांमध्ये काही उमेदवार पूर्वी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते होते. लेखी परीक्षेमध्ये उत्तर प्रदेशातील जिल्हे आणि झोनची संख्या, पक्षाचे मतदान टक्केवारी आणि मागील निवडणुकीत मतदारसंघांची संख्या यासह 14 प्रश्नांचा समावेश होता.
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी आणि एआयसीसीचे सोशल मीडिया समन्वयक रोहन गुप्ता यांनी या मुलाखती घेतल्या. यावेळी चतुर्वेदी म्हणाल्या, “जर तुम्हाला राज्याचे प्रवक्ते बनायचे  असेल, राज्याचे प्रतिनिधित्व करू इच्छित असाल तर  मूलभूत गोष्टींबद्दल तुम्हाला ज्ञान असणे आवश्यक आहे.”
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)