उत्तर प्रदेशात आणखी एका पुतळ्याची योजना

लखनौ – लोकसभा निवडणूक जवळ येत असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून भाजप सरकार आणखी एक 100 फुटी पुतळा उभारणार आहे. त्यातून राज्यातील पासी समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाचे योगदान असलेल्या पासी समाजाच्या उदा देवी या थोर महिलेचाहा पुतळा असणार आहे. तो राजधानी लखनौत उभारण्यात येणार आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात 71 जागा मिळविल्या होत्या. यातील 6 जागा पासी समुदायाची जास्त संख्या असलेल्या भागांत होत्या. तसेच पासी समुदायाचा प्रभाव असलेले. 23 विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. या संबंधात मोहनलाल गंज येथील पक्षाचे खासदार आणि भाजप अनुसूचित मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कौशल किशोर यांनी या पुतळ्याच्या उभारणीसाठी लोखंड दान करण्याचे आवाहन पासी समुदायाला केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उदा देवी यांचा एक छोटा पुतळा लखनौमधील सिकंदरबाग येथे उभा आहे. हा पुतळा तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनी 1990 मध्ये उभारला होता. उदा देवी यांनी 1857 मध्ये स्वातंत्र्याच्या लढाईत भाग घेतला होता. त्यांनी त्यावेळी सिकंदरबागजवळ तीन डझन ब्रिटिश सैनिकांना कंठस्नान घातले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)