उत्तर गुजरात मधून युपी बिहारी लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर 

संग्रहित छायाचित्र
बलात्काराच्या घटनेनंतर हल्ल्यांचे प्रमाण वाढले 
अहमदाबाद: उत्तर गुजरात मध्ये गेल्या आठवड्यात एका चौदा वर्षीय मुलीवर बिहार मधील एका मजुराने बलात्कार केल्याची घटना उघडकीला आल्यानंतर तेथे उत्तरप्रदेश आणि बिहार मधून आलेल्या मजुरांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मजुरांनी त्या राज्यांतून मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू केले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान गुजरात पोलिसांनी युपी व बिहारी लोकांवर हल्ला करणाऱ्या दीडशे जणांना अटक केली आहे. मात्र तरीही हे हल्ले सुरूच असल्याचेही सांगण्यात येते.
सबरकांठा परिसरात बिहार व युपीच्या लोकांवरील हल्ल्यांचे प्रमाण अधिक असून तेथे पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. त्यानंतर हल्ल्यांचे हे लोण गांधीनगर, अहमदाबाद, मेहसाणा येथेही पोहचले. त्यामुळे वातावरण अशांत बनले आहे.
राज्याचे पोलिस महासंचालक शिवानंद झा यांनी सांगितले की हिम्मतनगर मधील गंभोई गावातील बलात्काराच्या घटनेनंतर उत्तरप्रदेश आणि बिहारी नागरीकांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून हा गंभीर प्रकार आहे आम्ही तो कदापिही चालू देणार नाही. पोलिसांनी या हल्ल्यांच्या प्रकरणात हस्तक्षेप सुरू केला असून अनेक ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात सुमारे 150 जणांना आत्तापर्यंत ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. अल्पेश ठाकोर यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने हे हल्ले सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. तथापी ठाकोर यांनी लोकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे. हे हल्ल्यांचे प्रकार दुर्देवी आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)