अखिलेश यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याच्या तयारीत योगी सरकार

सरकारी बंगल्यात झालेल्या तोडीफोडीमुळे 10 लाखांचे नुकसान 

लखनऊ – यूपी मधील योगी सरकार अखिलेश यादव यांना सरकारी बंगल्यामध्ये तोडफोड करण्याच्या आरोपावरून नोटीस देण्याच्या तयारीत आहेत. पीडब्ल्यूडी विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीत बंगल्यात केलेल्या तोडफोडीमुळे 10 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार यूपी मधील सर्व माजी मुख्यमंत्र्याना सरकारी बंगले खाली करण्यात सांगण्यात आले होते. त्यानुसार अखिलेश यादव यांनी बंगला खाली करताना तोडफोड केली होती, याचे काही फोटोसुध्दा मीडियावर आले होते. त्यादरम्यान अखिलेश यादव यांनी म्हटले होते की, भाजप सरकार त्यांना बदनाम करण्यासाठी खोटे आरोप करत आहे. त्यांनी सरकारी बंगल्यात त्यांच्या गरजेनुसार आपल्या पैशातून जिम बनवली होती आणि त्याबरोबरच काही वस्तूही आणल्या होत्या. त्यापैकी काही वस्तू बंगला खाली करताना स्वत: बरोबर घेतल्या होत्या. पंरतु सरकारने याबाबत चौकशी सुरू केली होती.

पीडब्लूडी विभागाने याबाबतचा चौकशी अहवाल संपत्ति विभागाकडे सपूर्द केला आहे. अहवालानुसार बंगल्यात तोडफोड केल्याने 10 लाखांचे नुकसान झाले आहे. सुत्रांनुसार सरकार या नुकसान भरपाईच्या वसूलीसाठी अखिलेश यांना नोटीस पाठविण्याच्या तयारीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)