अंभेरी ग्रामस्थांचा पाण्याच्या काटकसरीसाठी अलिखीत नियम

वडूज – उन्हाळा सुरू झाला की पाणीटंचाई जाणवू लागते व साहजिकच पाण्याचा अपव्यय होत असल्याची चर्चा सर्वत्र झडू लागते. सरकार रेडिओ, दूरदर्शनमार्फत पाण्याचा काटकसरीबाबत जनजागृती करत असले तरी त्याकडे गांर्भियाने न पाहता पाण्याचा बेसुमार वापर खेड्यात व शहरात देखील होताना दिसतो. तथापि अंभेरी (ता. खटाव) या गावात पाण्याच्या वापर काटकसरीने करण्याविषयी गावकऱ्यांनी अलिखीत नियम बनवल्याचा अनुभव येत आहे.

गावाने दुष्काळाची दाहकता अनेकदा अनुभवली आहे. डिसेंबर महिना संपतो ना संपतो तोच गावाची प्रशासनाकडे टॅंकरच्या मागणीसाठी फरफट दरवर्षी ठरलेली असते. टॅंकर सुरू होईपर्यंत गावकऱ्यांच्या घशाला कोरड पडायची. गावाला दरवर्षी पाऊस जेमतेमच आसतो. 1972 दुष्काळात झालेल्या दोन तलावात पडणाऱ्या पाऊसाचे पाणी बऱ्यापैकी आडून राहते. एवढाच काय गावाला पाण्याचा आधार. मात्र पूर्वी गावच्या बेफिकीरीमुळे पाण्याचा आहे या पाण्याचा उपसा शेतीपासून सर्वच कामांसाठी केला जात असल्याने दुष्काळाचे हे एक कारण बनले होते. मात्र गावाला उशिरा का होईला उपरती झाली व सर्वानुमते हे पाणी शेतीसाठी वापरायचे नाही असा अलिखीत नियम घालून घेतल्याने पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटण्यास मदत झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज तालुका भयाण दुष्काळी परस्थितीला सामोरे जात आहे. मात्र या तलांवामधील पाण्याचा काटकसरीने वापर केल्याने गावाला दुष्काळाची पूर्वी एवढी दाहकता जाणवत नाही. दोन्ही पाझर तलाव भूजलासाठी फारच उपयुक्त ठरले आहेत. या तलावांचा पाझर जवळपासच्या विहीरींना व कुपनलिकांना समृध्द करण्यात झाला असल्याचा ग्रामस्थांच्या लक्षात आले आहे.
गावाला दरवर्षी जेमतेम पाऊस असला तरी तलाव हा आमच्यासाठी जलसंजिवनी आहे. तलाव्यातील पाण्याचा उपसा कटाक्षाने टाळण्याचा ग्रामस्थ प्रयत्न करतात. दुष्काळाची तीव्रता जास्त आहे.गावाला मे महिन्यात पाण्याची चणचण नक्कीच भासणार पण तोपर्यंत तरी या तलाव्यांच्या आधारामुळे पाण्याची चणचण जाणवणार नाही. मात्र दोन्हीही तलावे खुप जुने असल्याने तलाव्यात गाळ खुप साचला आहे. त्याचप्रमाणे आतमध्ये प्रचंड झाडी वाढली आहे व गळतीचे काम देखील करणे जरूरीचे आहे. प्रशासनाने त्वरीत या कामात लक्ष घालून या समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी ग्रामस्थ मंगेश शिंदे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)