संक्रमणाच्या काळातील अस्थिर मानसिकता घातक (भाग-१)

गुंतवणूक करताना दाखवली जाणारी शिस्त हे गुंतवणुकदाराचे भावनिक दृष्ट्या स्थिर असल्याचे लक्षण मानले जाते. नेहमीच शिस्तीचे रूपांतर यशस्वी गुंतवणुकीमध्ये होते. अनेक वेळा अर्थव्यवस्थेमध्ये कठीण काळ येत असतो, याचा थेट परिणाम शेअर बाजारात, देशातील उद्योग धंद्यांवर, बाजारातील तेजी – मंदी वर होत असतो. या प्रकारच्या चक्रांमुळेच खऱ्या अर्थाने

गुंतवणुकीमध्ये “मोठा परतावा” निर्माण होत असतो. अशा संक्रमणाच्या काळात गुंतवणुकदाराचीमानसिकता फार महत्त्वाची ठरते. गुंतवणुकीतील नियमितपणा आणि शिस्त हे गुण गुंतवणुकीमध्ये “मोठे यश” संपादन करण्यास नेहमीच मदत करत असतात.

प्रत्येक गुंतवणुकदार व बचत करणारे थोड्याच काळात बाजारातील व अर्थव्यवस्थेमधील चढ – उताराच्या ” चक्रात” सापडत असतो. अशा काळात बाजारात व गुंतवणुकीमध्ये खंबीर पाय रोवून उभे राहिले पाहिजे. गुंतवणूक केल्यानंतर पुढील एक – दोन वर्षांत नुकसान दिसू लागल्यास किंवा कमी परतावा दिसल्यास गुंतवणुकदाराने मानसिकदृष्ट्या विचलित होण्याची आवश्यकता नाही. इथे तुमच्या मानसिक शिस्तीची आणि खंबीरपणाची कसोटी लागत असते. या काळात तुम्ही कसे वागता यावरूनच तुम्ही तोट्यात जाणार की यशस्वी गुंतवणूकदार ठरणार याचा निर्णय होत असतो. बऱ्याच वेळा गुंतवणुकदार आपली गुंतवणुकीतील ठरवलेली उद्दिष्टे, ठरवलेला गुंतवणुकीतील कालावधी तसेच गुंतवणुकीतील पैशाची गरज नसतानाही केवळ बाजारातील घडामोडीमुळे  तसेच गुंतवणुकीतील नुकसानीच्या भितीमुळे गुंतवणुकीमधून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत जातात.

गुंतवणूक करण्यापूर्वी च अनेक महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर गुंतवणूक करताना काही गोष्टीं बाबत संभ्रम निर्माण झाल्यास आवर्जून आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्यायला हवी.

गुंतवणूक करताना पुढीलबाबींचे निश्र्चित नियोजन करावे….

* गुंतवणूकीचा कालावधी

* गुंतवणूकचे उद्दिष्ट

* गुंतवणुकीवर होणारा परतावा व लागणारा आयकर

* गुंतवणूकीचा योग्य पर्याय निवडा

* गुंतवणुकीच्या परताव्याबाबत योग्य अपेक्षा

* गुंतवणुकीमध्ये असणारी जोखिम ओळखा

” गुंतवणुकीमधील पारदर्शकता

* गुंतवणुकीतील वाढ अथवा घट वेळोवेळी कितपत शक्य आहे.

* अनपेक्षित घटना घडली असता गुंतवणूक हस्तांतरित करणे सुलभ रीतीने शक्य आहे का?

* महागाई व कमी होत जाणारे व्याजदर या पेक्षा जादाचा परतावा

संक्रमणाच्या काळातील अस्थिर मानसिकता घातक (भाग-२)

वरील सर्व बाबींचा गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल विचार करायला हवा आणि त्यानंतर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. गुंतवणूक केल्यावर अतिशय संयमाने ठरवलेली उद्दिष्टांचे लक्ष कायम समोर ठेवले पाहिजे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)