ओदिशातील “पैका’ क्रांतीकारकाच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे अनावरण

भुवनेश्‍वर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या ओदिशा दौऱ्यावर गेले होते. आयआयटी भुवनेश्वर परिसरात पंतप्रधानांच्या हस्ते “पैका’ या ओदिशी क्रांतीकारकाच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण करण्यात आले. 1817 साली “पैका’ यांनी ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध सशस्त्र क्रांती केली होती, जी इतिहासात पैका विद्रोह या नावाने ओळखली जाते.

यावेळी भुवनेश्वरच्या उत्कल विद्यापीठात “पैका’ यांच्या नावाने एक अध्यासन सुरु करण्याची घोषणाही करण्यात आली. पंतप्रधानांच्या हस्ते “ललितगिरी’ या वास्तुसंग्रहालयाचेही उद्‌घाटन झाले. ओदिशामधील ललितगिरी हे बौद्ध धर्माचे एक सुप्रसिद्ध सांस्कृतिक स्थान आहे. या जागेला पुरातत्वीय महत्वही असून येथे प्राचीन स्तूप आणि बुद्ध विहार आहे.
यावेळी पंतप्रधानांनी आयआयटी भुवनेश्वरचा नवा परिसर राष्ट्राला अर्पण केला तसेच कामगारांसाठीच्या इसीआयएस रुग्णालयाचे उद्‌घाटनही त्यांच्या हस्ते झाले. त्याशिवाय जलवाहिनी आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, आज उद्‌घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी झालेल्या प्रकल्पांची एकूण किंमत 14 हजार कोटींपेक्षा अधिक आहे. पूर्व भारताचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
आयआयटी भुवनेश्वरमुळे ओदिशाच्या औद्योगिक विकासाचा मार्ग खुला होईल तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांच्या जीवनमानात सुधारणा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. राज्यात आरोग्य सुविधा, रस्ते, तेल आणि घरगुती गॅस पाईपलाईन सुरु करण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)