अविवाहित मुलींनी मोबाईल वापरणे अयोग्यच

ठाकोर समाजाच्या पंचायतीने सोडले फर्मान

नवी दिल्ली : खाप पंचायत, जात पंचायती प्रमाणे आता गुजरातच्या ठाकोर समाजानेदेखील आपले कायदे करण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे. कारण ठाकोर समाजातील अविवाहित मुलींनी मोबाईल वापरायचा नाही, असे फर्मानच समाजाच्या पंचायतीने सोडले आहे. ठाकोर समाजाच्या लोकांनी नुकतीच एक पंचायत ठेवली होती. जालोल गावात झालेल्या या पंचायतीमध्ये मुलींनी मोबाईल वापरणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. गावातील लोक पंचायतीच्या नियमांनाच त्यांचे संविधान मानत आहेत. या पंचायतीचे लोक समाजाचे नियम बनवितात. या नव्या नियमानुसार अविवाहित मुलगीने मोबाईल बाळगणे ठाकोर समाजाच्या नियमांचे उल्लंघन करत गुन्हा समजला जाणार आहे.

जर समाजाच्या अविवाहित मुलीकडे मोबाईल आढळला तर तिच्या वडिलांना 1.5 लाख रुपयांचा दंड पंचायतीकडे जमा करावा लागणार आहे. तसेच जर एखादी मुलगी कुटुंबियांच्या परवानगीशिवाय लग्न करत असेल तर त्यालाही गुन्हा मानला जाणार आहे. जिल्हा पंचायत सदस्याने सांगितले की, पंचायतीने समाजहितामध्ये काही निर्णय घेतले आहेत. विवाहावेळचा अवास्तव खर्च रोखण्यासाठी डिजे, फटाके वाजविण्यावर बंदी आणली आहे. मोबाईल फोन बाळगणे आणि त्यावर दंड आकारण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे, मात्र लागू करण्याचा निर्णय झालेला नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)