बेकायदेशीर घुसखोरांमुळे अमेरिकेवर दरवर्षी शंभर अब्ज डॉलर्सचा बोजा : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्याला असलेल्या निर्वासितांमुळे किंवा घुसखोरांमुळे अमेरिकन प्रशासनाला दर वर्षी किमान शंभर अब्ज डॉलर्सचा बोजा सहन करावा लागतो असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. सामान्य अमेरिकन करदात्यांचा पैसा अशा अनावश्‍यक बाबींवर खर्च होत असून हा करदात्यांच्याच पैशाचा अपव्यय आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

लॅटिन अमेरिकेच्या अल सॉल्वाडोर, होंडुरास आणि ग्वाटेमाला या तीन देशांतील एकूण सुमारे पाच ते सात हजार लोक अमेरिकेच्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत आहेत. हे लोक अमेरिकेच्या दक्षिणेकडील सीमा भागात जमले आहेत त्यांना अमेरिकेत प्रवेश देण्यास ट्रम्प यांनी सक्त विरोध दर्शवला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे. या लोकांना रोखण्यासाठी सीमेवर मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात करण्यात आले आहे. सुरूवातीला त्यांनी या बेकायदा घुसखोरांवर गोळ्या घातल्या जातील असा इशारा दिला होता पण त्यांनी आता त्याविषयीची आपली भूमिका बदलली असून सैनिक घुसखोरांना गोळ्या घालणार नाहीत पण त्यांना अटक करून देशाबाहेर सोडले जाईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेत बेकायदा निर्वासितांवर होणाऱ्या खर्चातून आपल्या देशवासीयांना बऱ्याच सोयी सुविधा पुरवता येऊ शकतात. त्यामुळे देशाचा हा वायफळ खर्च आम्ही सहन करणार नाही आणि या लोकांचा नाहक बोजाही अमेरिका स्वीकारणार नाही असे त्यांनी निक्षुन सांगितले आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागातून मोठ्या प्रमाणात देशात मादक द्रव्ये आणली जातात त्या व्यवहारात हे घुसखोरच गुंतलेले असतात असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)