‘विद्यापीठांनी रामायण आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या वास्तूंचा अभ्यास करावा’

  • आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ
  • महाराष्ट्रातील विद्यापीठांनी रामायण आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या वास्तूंचा अभ्यास करावा

मुंबई: रामायण हे भारतीय जीवनमूल्यांचे एक सार असून रामायण प्रेम,आदर, आज्ञाधारकता, सत्य आणि त्यागाची कथा आहे. असत्यावर सत्याचा विजय सिद्ध करणारी महागाथा असलेल्या या महाकाव्यामुळे नवीन पिढीचे विचार, आदर्श आणि चरित्र आकाराला येईल, असा विश्वास राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.

पर्यटन विभागाच्या वतीने मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचा विद्यासागर राव यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी राज्यपाल म्हणाले, आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवात सहभागी होणाऱ्या राष्ट्रांसह मूल्यांचा आणि सांस्कृतिक सादरीकरणाचा वापर करून भारत आपल्या ऐतिहासिक दुव्यांचे पुनरुज्जीवन करीत आहे. हजारो वर्षांपासून रामायणाने संस्कृती, धर्म क्षेत्राच्या सीमा पार केल्या आहेत. रामायण हे आजच्या पिढीशी सुसंगत असल्याने महाराष्ट्रातील विद्यापीठांनी रामायण आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या वास्तूंचा अभ्यास करण्याचे आवाहन विद्यासागर राव यांनी यावेळी केले.

रामायण महोत्सवाच्या माध्यमातून सर्व देशांना एकत्रित आणून त्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील रामायण सर्किटच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. रामायण हा फक्त ग्रंथ नसून भारतीय जीवनमूल्यांचा तो एक सार आहे. भारतासह अनेक देश रामायणाशी जोडले गेले आहेत. रामायण महोत्सवाच्या माध्यमातून या सर्व देशांना एकत्रित आणणे तसेच देशभरातील रामायण सर्किटच्या विकासाला चालना देणे असे उद्देश साध्य होतील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)