विद्यापीठांनी काश्‍मिरी विद्यार्थ्यांची सुरक्षा सांभाळावी- यूजीसी

नवी दिल्ली: देशातील सर्व विद्यापीठांनी काश्‍मिरी विद्यार्थ्यांची सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आदेश दिले आहेत. काश्‍मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्‍मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर यूजीसीने देशातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना त्यांच्या विद्यापीठांच्या आवारात काश्‍मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्याबाबत कळवले आहे.

काश्‍मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व विद्यापीठांना सल्ला द्यावा, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाला लिहिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काश्‍मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत माध्यमांतून अहवाल येत असल्याने, विविध उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या काश्‍मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवावे, कुलगुरूंनी या बाबतीत स्वत: लक्ष द्यावे असे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)