केंद्रीय मंत्र्याच्या ओएसडीने केली गोयल यांच्यावर टीका

रेल्वे मंत्रालयाने केली कारवाईची शिफारस

नवी दिल्ली: पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांचे ओएसडी म्हणून नेमण्यात आलेले अधिकारी संजीवकुमार यांच्यावर रेल्वेमंत्री पीयुष गोयल आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यावर टीका करणारा लेख वेबसाईटवर लिहील्याच्या कारणाने शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाने कार्मिक विभागाकडे केली आहे.

रेल्वेबोर्डाचे सेक्रेटरी रजनीश सहाय यांनी कार्मिक विभागाकडे पत्र पाठवून संजीवकुमार यांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करून मुळ रेल्वे विभागाकडे पाठवून द्यावे अशीही मागणी केली आहे. संजीवकुमार हे रेल्वे विभागाचे 2005 चे अधिकारी आहेत. त्यांची जितेंद्रसिंह यांच्या कार्यालयात त्यांचे ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन वेबसाईटवर त्यांचा हा लेख प्रकाशित झाला आहे त्यात त्यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारी टिपण्णी केली आहे. रेल्वेमंत्रालयातील कारभार नीट चाललेला नाही. त्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असून या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने त्वरीत हस्तक्षेप करण्याची गरज आहे अशी सुचनाही संजीवकुमार यांनी त्यात केली होती. रेल्वेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत सध्या मोठे वादंग माजले आहे. त्यातील नियुक्‍त्यांना अन्य अधिकाऱ्यांचाही आक्षेप आहे. हाच विषय घेऊन संजीवकुमार यांनी रेल्वे मंत्रालयाच्या कारभारावर टीका केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)