सिनेसृष्टीत कोणी समलैंगिक कलाकार नसणे दुर्दैवी – कोंकणा 

“पेज 3′ आणि “आणि “ट्रॅफिक सिग्नल’ सारख्या सिनेमांमधून दमदार अभिनय करणाऱ्या कोंकणा सेन शर्माला बऱ्याच दिवसात पडद्यावर कोणी बघितले नाही. आता कोंकणा पुन्हा एकदा पडद्यावर येणार आहे. “ए मान्सून डेट’ असे कोंकणाच्या नवीन सिनेनाचे नाव आहे.

यामध्ये ती प्रथमच एका समलैंगिक व्यक्‍तीची भूमिका साकारणार आहे. हा रोल जर फिल्म इंडस्ट्रीतील एखाद्या समलैंगिक कलाकाराने साकारला असता, तर अधिक चांगले झाले असते. समलैंगिक व्यक्‍तीच्या भावना पडद्यावर दाखवणे हे त्याच व्यक्‍तीला अन्य कोणाही सर्वसामान्य व्यक्‍तीपेक्षा अधिक शक्‍य झाले असते. अशी एलजीबीटी व्यक्‍ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये नसणे हे दुर्दैवाची बाब आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या पुढारलेल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणीच समलैंगिक कलाकार अशी भूमिका साकारण्यासाठी उपलब्ध होऊ शकत नाही. याची खंतही तिला जाणवते आहे. जर एखाद्या समलैंगिक विषयांवरील जास्तीत जास्त कथा लोकांसमोर मांडल्या गेल्या, तर असे समलैंगिक कलाकार अशा भूमिकांसाठी स्वतःहून पुढे येऊ शकतील, असे तिला वाटते.
“ए मान्सून डेट’ही एका अशा युवतीची कथा आहे, जिला तिच्या मैत्रिणीला तिच्या इतिहासाबाबत सांगायचे असते. गजल थालिवाल द्वारा लिहीलेल्या कथेवरच्या या सिनेमाचे डायरेक्‍शन तनुजा चंद्रा करणार आहे.

यापूर्वी “पेज 3′ मध्ये कोंकणाच्या मित्राला समलैंगिक म्हणून दाखवले गेले होते. समलैंगिक संबंधांच्या मुद्दयावर “अलिबाग’ आणि “फायर’ सारखे सिनेमे येऊन गेले. त्याला विश्‍लेषकांनी खूप गौरवलेही होते. पण प्रत्यक्षात समलैंगिक व्यक्‍तींना मानाने वागवले जात नाही. त्यांच्याबाबत हिणकस वागणूकच दिली जाते. त्यांना तुच्छ लेखले जाते, याचे कोंकणाला वाईट वाटते.

“पेज 3′ आणि “लिपस्टीक अंडर माय बुरखा’मधून कोंकणाची बंडखोरी यापूर्वीही सिनेमातून दिसून आली आहे. “डॉली किटी और वो चमकते सितारे’ या आणखी एका सिनेमातून तिची बंडखोर भूमिका दिसणार आहे. त्यात तिच्याबरोबर भूमी पेडणेकर असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)