भारतात बेकारीचा दर बराच कमी: मात्र असुरक्षित रोजगाराचे प्रमाण चिंताजनक 

आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या अहवालातील निष्कर्ष 

नवी दिल्ली: भारतातील बेकारीचा दर चीनसह इतर देशांपेक्षा कमी आहे. मात्र, रोजगाराचा दर्जा आणि असुरक्षित रोजगारांचे प्रमाण जास्त असल्याचे आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या (आयएलओ) याबाबतच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. चालू वर्षामध्ये भारतात बेकारीचा दर 3.5 टक्के राहणार असल्याचा अंदाज आयएलओने सादर केलेल्या एका अहवालामधून मांडला आहे. तर दुसरीकडे चीनमधील बेकारीची असलेली टक्‍केवारी 4.7 वरून 4.8 टक्‍के इतका वाढणार असल्याचा अंदाज यादरम्यान सादर केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतात बेकारीच्या टक्‍क्‍यांत कमी प्रमाण असले तरी जवळपास 77 टक्‍के रोजगार असुरक्षित असल्याचे अनुमान याचवेळी मांडण्यात आले आहे. या असुरक्षेचे प्रमाण परदेशी देशामध्ये कमी असल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये 33 टक्‍केच रोजगार असुरक्षित श्रेणीमध्ये राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. आशिया आणि प्रशांत महासागराच्या क्षेत्रात आर्थिक विकासाचा दर 5.5 टक्‍के राहणार असल्याचे द वर्ल्ड एम्प्लॉयमेन्ट ऍण्ड सोशल आऊटलूक-टेड्रर्स 2018 या अहवालातून सांगण्यात आले आहे. तर भारतीय अर्थव्यवस्था दक्षिण आशियातील आर्थिक विकास वाढवण्यास चालना देणार असून 2018 मध्ये जीडीपी 7.4 टक्‍के वाढण्याचा अंदाज आहे. तर हाच विकास मागील वर्षात 6.7 टक्‍के इतका राहिला होता. असेही या अहवालामधून मांडले आहे. भारत, बांगलादेश, कंबोडिया आणि नेपाळ असंघटित क्षेत्रात जवळपास 90 टक्‍के कामगार आहेत. याचे मुख्य कारण या देशामध्ये कृषीबरोबर बांधकाम आणि होलसेल रिटेल व्यापाराचे क्षेत्र मोठया प्रमाणात संघटित असल्याचे दिसून येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)