भारत वि.श्रीलंका (U-19) : यशस्वी जयस्वालच्या शतकी खेळीने भारत विजयी

विजयासह मालिकाही घातली खिशात

श्रीलंका – यशस्वी जयस्वालच्या नाबाद शतकी खेळीमुळे भारतीय 19 वर्षाखालील संघाने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचा आठ गडी राखत पराभव केला. या विजयासोबत भारताने पाच सामन्याच्या मालिकासुध्दा 3-2 ने आपल्या नावावर केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 212 धावा केल्या होत्या. विजयासाठी असलेल्या 213 धावांचे लक्ष्य भारताने 42.4 षटकामध्ये 2 गडी गमावत पूर्ण केले. आघाडीचा फलंदाज यशस्वीने चांगली कामगिरी केली. त्याने 128 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 114 धावा केल्या.

भारतीय गोलंदाजीमध्ये मोहित जांगडा याने 30 धावा देत 2 गडी बाद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)