निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उंब्रज पोलिसांनी केले संचलन

उंब्रज – लोकसभा निवडणूका 2019 या निर्भय व भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख यांच्या आदेशानुसार उब्रंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उंब्रज, मसूर, तारळे, चाफळ गावामध्ये अधिकारी, कर्मचारी व आरएसपी. पथकाच्यावतीने रूट मार्च व मॉकड्रीलचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय व व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या उंब्रज ता. कराड येथील पोलीस ठाण्यापासून सुरुवात झालेले रूटमार्च बसस्थानक परिसर, माणिक चौक, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक असे काढण्यात आले. तेथे मॉकड्रिलचे प्रात्यक्षिक केले. त्यानंतर कॉलेज रोडवरून सुरभी चौकातून चोरे रोडमार्गे पुन्हा पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आले.

उंब्रज पोलिसांनी फौजफाट्यासह संचलन केले. निवडणुकीत दहशत पसरवणे या गोष्टीला चाप बसावा तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण न होता निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून या संचलनद्वारे पोलिसांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन केले.

कोणाच्या दबावाखाली न राहता नागरिकांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे सध्या आचारसंहिता असल्याने जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री जमाव जमवून गोंधळ माजवू नये तसे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशा सूचना अजय गोरडे यांनी दिल्या. संचलनात उंब्रचे पोलीस उपनिरीक्षक जोत्स्ना भांबिष्टे, एम. के. आवळे, निलेश अपसुंदे तसेच स्थानिक पोलीस सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)