अवैध दारू अड्ड्यांवर उंब्रज पोलिसांची कारवाई

27 हजाराचा मुद्देमाल जप्त
उंब्रज –
उंब्रजसह मसूर ,चाफळ पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या हद्दीत नऊ ठिकाणी अवैध देशी दारू, ताडी विक्रीवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यामध्ये 27 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाया 15 दिवसात करण्यात आल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, चाफळ ता. पाटण गावच्या हद्दीत घराच्या आडोशाला अंकुश निवृत्ती साळुंखे वय 48 रा. चाफळ ता. पाटण हा 2 हजार 496 रुपयांच्या 48 देशी दारूच्या बाटल्यांची विक्री करत असताना रंगेहाथ सापडला. मरळी ते चोरेकडील रस्त्याला मोहन साधु कवळे रा. मरळी हा 2 हजार 80 रुपयांच्या 40 देशी दारूच्या बाटल्या समवेत मिळून आला. उंब्रज येथे एका दुकान गाळ्यात 2 हजार 250 रूपयांच्या ताडीसह विघ्नेस बाला गौड रा. उंब्रज हा सापडला.

इंदोली गावच्या हद्दीत एका वस्तीमध्ये जनावरांचे गोठ्याच्या आडोशाला दत्तात्रय मारुती देटके वय 58 रा. इंदोली हा 2 हजार 496 रूपये किंमतीची देशी दारूची विक्री करत असताना मिळून आला. रिसवड येथील पाण्याच्या टाकीशेजारी पानटपरीच्या आडोशाला सीता सुभाष दाभाडे रा. रिसवड ही 6 हजार 656 रुपये किंमतीच्या देशी दारूची विक्री करताना सापडली. हेळगाव ते रहिमतपूरकडे जाणाऱ्या रोडवर सतिश राजाराम मदने रा. हेळगांव हा 2 हजार 496 रुपये किंमतीच्या देशीदारूच्या 48 बाटल्यांची विक्री करत असताना मिळून आला.

निगडी येथे सुनिता हरिश्‍चंद्र गायकवाड वय 35 रा. खराडे हिच्याकडून 1 हजार 248 रुपये किंमतीच्या 24 देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. पेरले येथे गोपाळ वस्तीकडे जुन्या घराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेच्या आडोशाला शंकर लक्ष्मण यादव वय. 69 रा. पेरले हा 7 हजार 488 रुपये किंमतीच्या देशी दारुची विक्री करत असताना मिळून आला. कांबीरवाडी गावच्या हद्दीत मसूर रोडलगत चंद्रकांत सदाशिव मोहिते वय 39 विनोदकुमार प्रजापती दोघे रा. मसूर हे 1 हजार 872 रुपये किंमतीची देशी दारू विक्री करत असताना रंगेहाथ मिळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)