उमा भारती लोकसभेची निवडणूक लढणार नाही; राम मंदिरावर लक्ष केंद्रीत करणार

नवी दिल्ली: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी पुढील वर्षाची लोकसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अयोध्येतील राम मंदिर आणि पुढील दिडवर्षात गंगा नदीच्या स्वच्छतेच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये त्यांनी या निर्णयाची घोषणा केली.

राम मंदिराच्या आंदोलनकाळात उमा भारती या सर्वात आघाडीच्या नेत्या होत्या. राममंदिर ही आपल्या पक्षाचीच जबाबदारी नाही. त्यामुळे राममंदिरासाठी अन्य पक्षांनीही पुढे यायला पाहिजे, असे त्या गेल्या आठवड्यात म्हणाल्या होत्या. भाजपच्या समविचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दलासारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी राममंदिरासाठी स्वतंत्र अध्यादेशाचा आग्रह धरायला सुरुवात केली आहे. संघाने तर 1992 सारखे मोठे आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)