भाजपच्या उपाध्यक्षपदी उमा भारती यांची नियुक्ती

नवी दिल्ली – भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व केंद्रीय मंत्री उमा भारती यांची भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्‍ती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. याबाबतीच घोषणा केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी केली आहे. उमा भारती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपवली आहे. 2016मध्ये उमा भारती यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले होते. याबाबत त्यांनी शुक्रवारी निर्णय घेतला आहे.

यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय उमा भारती यांनी घेतला आहे. मात्र त्यांना पक्षासाठी काम करायचे आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे, असे जेपी नड्डा यावेळी म्हणाले.
नवी जबाबदारी मिळाल्यानंतर उमा भारती म्हणाल्या, मी जर लोकसभा निवडणूक लढवली असती तर झांसीमधूनच लढवली असती. माझ्या मतदारसंघातील लोकांना माझ्यावर विश्वास असून ते मला त्यांची मुलगी मानतात. 2016 मध्ये निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मला गंगा नदीच्या तीर्थस्थानांवर जायचे आहे, पुढील दीड वर्षात गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी काम करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पक्षाने मला मुख्यमंत्री पदापासून केंद्रिय मंत्री पदापर्यंत खूप काही दिले आहे. भाजपाचे अध्यक्ष पद सोडून जवळपास सर्व संस्थात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मी 5 मेपर्यंत निवडणूक प्रचार करणार आहे, असे उमा भारती म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)