युक्रेननेच रशियासोबत तणाव वाढवला

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची टीका

मॉस्को (रशिया): युक्रेन आणि रशियादरम्यानचा तणाव वाढत असताना रशियाने युक्रेनच्या अध्यक्षांवर सडकून टीका केली आहे. 2019च्या निवडणुकांपूर्वी आपले रेटिंग सुधारण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेंको यांनी जाणीवपूर्वक रशियासोबत तणाव निर्माण केला असल्याचा आरोप रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला आहे.

-Ads-

रशियाने युक्रेनच्या तीन जहाजांवर हल्ला करून जहाजावरील 23 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर युक्रेनच्या काही भागांत मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. रशियाच्या संभाव्य हल्ल्‌याची शक्‍यता असलेल्या किनारी भागात 30 दिवसांसाठी हा मार्शल लॉ लागू असेल.

अध्यक्ष पोरोशेंको यांना या तणावातून आपली रेटिंग वाढवायची असल्याचे पुतिन म्हणाले. बुधवारी एका इन्वेस्टमेंट फोरममध्ये या वादावर आपली मते मांडली. त्यांना परिस्थिती चिघळवण्यासाठी काहीतरी करायचं होते, असे पुतिन म्हणाले. रशियासोबत युद्धाच्या भीतीमुळे देश धोकादायक परिस्थितीत आहे. असे पोरोशेन्को यांनी एका टीव्ही मुलाखतीत म्हटले आहे. रशियाने 2014ला ताब्यात घेतलेल्या क्रिमियापासून काही अंतरावर रशियाने समुद्रातील युक्रेनच्या 3 बोटींवर हल्ला केला आणि या बोटी जप्त केल्या. यामध्ये युक्रेनचे किमान तीन खलाशी जखमी झाले आहेत. रशियाची ही कृती म्हणजे आगळिक असल्याची टीका युक्रेनने केली आहे.

रशियाने या जहाजांनी बेकायदेशीररीत्या समुद्रात प्रवेश केल्याचे म्हटले आहे. रशियाने युक्रेनच्या या खलाशांची साक्षही टीव्हीवर प्रसारित केली असून त्यामध्ये युक्रेनचे खलाशी त्यांची कृती रशियासाठी प्रक्षोभक असल्याचे मान्य करताना दिसतात. पण, आमच्या खलाशांना बळजबरीने डांबून त्यांनी कबुली देण्यास भाग पाडले आहे, असा दावा युक्रेन नौदलाच्या प्रमुखांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)