पाणीप्रश्नावरून विधानसभेत हल्लाबोल; पवार आणि महाजन यांच्यात शाब्दिक चकमक

मुंबई: सोमवारपासून पावसाळी अधिवेश सुरू झालं आहे. दरम्यान, विरोधकांनी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवरून घेरण्याचा प्रयत्न केला. आज विधानसभेत पाण्याच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात तुफान शाब्दिक राडा झाला.  उजनीच्या पाणीप्रश्नावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

उजनी धरणाच्या पाण्याच्या उपशाबाबत जे ढिसाळ नियोजन झालं, त्याबाबत अजित पवार यांनी विधानसभेत आवाज उठवला. ते म्हणाले, “यंदाच्या वर्षी उजनी धरण शंभर टक्के भरलं होतं. आमच्या काळात या धरणाची उंची वाढवली होती. त्यामुळे आज तिथे 14 ते 15 टक्के अधिक पाणीसाठा आहे. तरी आज धरणात 58 टक्के मायनस इतकंच पाणी उरलंय. मग पूर्ण धरण भरलेलं असताना एवढ्या पाण्याचा विसर्ग कसा झाला? अजिबात नियोजन झालेलं नाही. याला अधिकारी जबाबदार की सरकारमधलं कुणी तरी की इथले पालकमंत्री की जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष दिलं नाही, हे सरकारने शोधून काढावं. मात्र त्यामुळे इथल्या सर्वसामान्य जनतेला पाण्यापासून वंचित राहावं लागतंय.

तसेच बालभारती च्या अभयसक्रमात करण्यात आले बदलावरून विरोधकांनी भाजपवर टीका केली.  बावनकुळेंना 502कुळे असं म्हणायचं का? किंवा फडणवीसांना फडण20, असा टोला अजित पवारांनी लगावला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)