…तर उजनी 50 टक्केही भरणार नाही

अद्याप 34 टक्केच पाणीसाठा; पावसाची उघडीप, विसर्गही थांबला

इंदापूर – पुणे जिल्ह्यातील धरण साखळीतून बंद झालेला विसर्ग तसेच सोलापूर जिल्ह्यात जून ते जुलै अशा दोन महिन्यांत केवळ 109 मि.मि. पाऊस झाल्याने उजनी धरणामध्ये जुलैअखेर केवळ 34.70 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही तर उजनी यंदा 50 टक्केही भरू शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया आताच दिसू लागली आहे.

-Ads-

उजनी धरण मागील वर्षीपेक्षा यंदा एक आठवडा आधी मृतसाठ्यातून बाहेर आले. पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणारा विसर्ग थांबविण्यात आल्यामुळे उजनीची पाणीपातळी 34 टक्केवरच राहिली आहे. जून महिन्यातील काही दिवस वगळता गेल्या दोन महिन्यांत उजनी धरण क्षेत्रात एकदाही दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे धरणावरील मध्यम व लघु प्रकल्पातही पाणीसाठा झालेला नाही. उत्तर सोलापुरातील तालुक्‍यात 49.34 टक्के, दक्षिणेकडील तालुक्‍यांत 43.96 टक्के, माढा तालुक्‍यात 49.51 टक्के, करमाळा तालुक्‍यात 39.87 टक्के तर मंगळवेढा तालुक्‍यात 47.37 टक्के पाऊस झाल्याने सध्या या भागावर दुष्काळी छाया आहे. याच कारणातून पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस होवून उजनी धरण 100 टक्के भरणे गरजेचे ठरणार आहे.

विसर्ग सोडण्याची शक्‍यता कमी
भीमाखोऱ्यातील कळमोडी वगळता चासकमान 97.24, भामाआसखेड 81.49, वडीवळे 87.23 तर मुळामुठा वरील खडकवासला, पानशेत वगळता अन्य धरणे अद्यापही भरलेली नाहीत. यामुळे ही धरणे भरल्यानंतरच उजनी धरणाकडे जाणारा विसर्ग सुरू होवू शकेल. सध्याची पावसाची स्थिती पाहता. धरणे भरण्याबाबत शंका असल्याने उजनीत विसर्ग सोडण्याची शक्‍यताही कमीच आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)