मोबाईलमध्ये ‘UIDAI’ नावाचा नंबर सेव्ह?

मुंबई – देशभरातल्या मोबाईल धारकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. देशातील अनेकांच्या मोबाईलमध्ये एक नंबर आपोआप सेव्ह झाल्याचे समोर येत आहे. युनिक आयडेन्टिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचा (UIDAI) मदत क्रमांक अनेकांच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह होत आहे. त्यामुळे अनेकजण आश्‍चर्यचकीत झाले आहेत.

मात्र UIDAIने या प्रकरणी हात झटकत या क्रमांकाशी आपला संबंध नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा एखादा हॅकिंगचा प्रकार असण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळपासून एक टोल फ्री नंबर अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह होत असून तो आधारचा असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत UIDAIने ट्‌विटरवर स्पष्टीकरण देत हा नंबर आपला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, UIDAIचा जुना हेल्पलाईन नंबर लोड झाल्याबद्‌दल गुगलने दिलगिरी व्यक्‍त केली आहे.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)