UIADI चे सत्य आणि अफवा !

– विनायक पाचलग
गेले काही तास अचानक काही मोबाईल मध्ये सेव्ह झालेला आधारचा संपर्क क्रमांक आणि त्यानंतर आलेल्या अफवांना चांगलेच पेव फुटले आहे. त्याबद्दल शक्य तेवढी सत्य माहिती व तर्क देत आहे. ज्याने निदान काही शंकाचे निरसन होईल. 
१. आपण फोन वापरत असताना जवळपास सर्वच अँपला ” कॉन्टॅक्टस” ची परमिशन देतो. ही परमिशन दिल्यानंतर ते अँप आपले सर्व कोंटक्ट्स वापरू तर शकतेच शिवाय आपल्याला न सांगता एखादा क्रमांक सेव्ह ही करू शकते.
२. अँड्रॉईड ही ओ एस गुगल ची आहे, त्यामुळे त्यांना तर असे कॉन्टॅक्टस कधीही ऍड करता येणे अगदी सहज शक्य आहे. ते काही क्रमांक त्यांचा सेट अप विझर्ड मध्ये देतात.
३. त्यामुळे आता अचानक एखाद्या फोन मध्ये आधार चा कॉन्टॅक्ट नंबर दिसणे हे एखाद्या अँप मुळे किंवा गुगल मुळं प्रोग्रामटीकली झालेले असू शकते. त्यात हॅकिंग वगैरे काही असायची शक्यता फारच कमी आहे .
४. धन्या राजेंद्रन यांच्या वॉल वर लिहिल्यानुसार गुगल च्या सेट अप विझर्ड मध्ये हा क्रमांक २०१४ साली होता आणि तो त्यांनी सगळया ओ इ एम ना दिलेला होता. तो आता काही कारणाने ट्रिगर झाला असावा. ही कारणे एखाद्या अँप चे अपडेट होणे इथपासून ओ एस चे अपडेट होणे अशी काहीही असू शकतात.
५. ही घटना सर्वच फोनवर घडलेली नाही कारण प्रत्येकाची अँड्रॉइड ची व्हर्जन व ओ इ एम चे सिक्युरिटी फीचर्स वेगळे असतात. त्यामुळे ही घटना सार्वत्रिक नाही
६. अशीही एक वेगळी शक्यता आहे की काही जणांकडे हा क्रमांक २०१४ पासूनच आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह आहे पण आजवर तिकडे लक्षच गेलेले नाही. आज आधार म्हणले की एवढे संशयाचे भूत निर्माण केले आहे की आपल्याला ते आज जाणवले असावे.
७. यु आय डी ए आय ने फक्त हे आम्ही केलेले नाही एवढाच खुलासा केला आहे. त्यामुळे, हे कोणी केले हे शोधण्यासाठी ज्यांच्याकडे हा नंबर दिसला त्यांचा मोबाईल डिव्हाईस, ओ एस व्हर्जन, त्यांच्या फोनवर असणारी अँप असे बरेच मुद्दे तपासावे लागतील व त्यातून शोध घ्यावा लागेल, तसा शोध लोक घेत असतीलच. येत्या २४-४८ तासात सत्य बाहेर येईलच
८. प्रथम दर्शनी तरी हा हॅकिंग चा प्रकार वाटत नाही. याचा आणि तुमच्या आधार सुरक्षिततेचा तरी शून्य संबंध आहे.
९. आपण स्वतः च काही अँप ना अगदी ” रूट” परमिशन दिलेल्या आहेत, त्यामुळे आपला मोबाईल हा व्हलनरेबल आहे यात शंका नाही. पण तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे.  एखादा क्रमांक ऑटोमॅटिक सेव्ह होणे हा त्यातल्या त्यात सर्वाधिक हार्मलेस प्रकार आहे. याहून अजून डाटा चोरीच्या गोष्टी अँप्स मधून सुरू असतात. त्यामुळे, सध्या तरी तुम्ही निवांत राहायला हरकत नाही .
१०. एका अँड्रॉइड अँप बनवणाऱ्या कंपनीचा चालक आणि सोशल मीडियाचा अभ्यासक या दोन्ही भूमिकेतून जेवढी माहिती मला आहे त्यावर वरील मुद्दे आधारीत आहेत. त्यात काही चूक असेल तर ती निदर्शनास आणून द्यावी, दुरुस्ती केली जाईल . जशी अधिक माहिती मिळेल तशी अपडेट करिनच

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)