शिवाजी विद्यापीठातील चार अभ्यासक्रमांना युजीसीची मान्यता

कोल्हापूर: विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचेकडून शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राकडील उर्वरित चार अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली असून आता एकूण तेरा पैकी सर्वच अभ्यासक्रमांना ही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ हे सर्वच अभ्यासक्रमांना मान्यता मिळविणारे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे, अशी माहिती दूरशिक्षण केंद्राचे उपकुलसचिव डॉ. एन. जे. बनसोडे यांनी दिली.

यातील एम.ए. (इंग्रजी), एम.ए. (अर्थशास्त्र), एम.एस्सी. (गणित), एम.कॉम. (व्हॅल्यूएशन ऑफ रिअल इस्टेट) या पदव्युत्तर विषयांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. www.unshivaji.ac.in या संकेतस्थळावर Distance Education या लिंकवर ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हे अर्ज नियमित शुल्कासह दि. 1 फेब्रुवारीपर्यंत, विलंब शुल्कासह दि. 9 फेब्रुवारी, तर दि. 15 फेब्रुवारीपर्यंत अतिविलंब शुल्कासह भरता येणार आहे. दूरशिक्षण केंद्राच्या चार अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली असल्याने जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत, अशांनी सदर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा, असे आवाहन दूरशिक्षण केंद्राचे संचालक प्रा. डॉ. एम. ए. अनुसे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)