उद्धव ठाकरेंबरोबरच्या चर्चेत सहभागी होणार नाही 

– नाराज मुनगंटीवारांनी केला खुलासा

मुंबई – अवनी वाघिणीच्या मृत्युच्या संबंधात शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जी टीका सरकारवर केली आहे ती मला मान्य नाही. त्यामुळे मी यापुढे उद्धव ठाकरे यांच्याशी युतीची चर्चा करण्यास उत्सुक नाही अशी भूमिका नाराज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. काही निवडक पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी अवनी वाघाणीच्या संबंधात जी विधाने केली आहेत त्याविषयी मी माझी नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांना फोन केला होता. त्यावेळी मनेका गांधी यांनी आपल्याला तशी विधाने करण्यास सांगितले होते असे उद्धव ठाकरे यांनी आपल्यास सांगितले आहे असे ते म्हणाले.

तुमच्या विधानांमुळे मी कमालीचा दुखावलो गेलो आहे हे मी उद्धव ठाकरे यांना स्पष्टपणे नमूद केले, मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. ते माझे चांगले मित्र असताना त्यांनी असे बोलणे योग्य नव्हते. तथापी मनेका गांधी यांनी आपल्याला फोन करून अवनी वाघीणीच्या मृत्यू प्रकरणात सरकारला विरोध करा अशी सुचना आपल्याला केल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला असेही मुनगंटीवार यांनी नमूद केले.

-Ads-

भाजप मध्ये कोणीही शिवसेनेशी युती करण्याच्या विचारात नसताना मी मात्र शिवसेनेबरोबर युतीची चर्चा व्हावी यासाठी कायम आग्रही राहिलो.चर्चेत पुढाकार घेतला, पण आता मात्र मला त्यांच्याशी युतीची चर्चा करण्यात काहीही स्वारस्य नाही असे मुनगंटीवारांनी नमूद केले. या प्रकरणावरून तुम्ही इतके का नाराज झाला आहात असे विचारता ते म्हणाले की या प्रकरणावरून लोकांनी अत्यंत आक्षेपार्ह व चुकीच्या प्रतिक्रीया सोशल मिडीयावर नोंदवल्या आहेत त्यानेही आपण व्यथित झालो आहोत.

मी स्वत: सोशल मिडीया हाताळत नाही. त्यामुळे त्यावरील प्रतिक्रीयांची माहिती मला मिळत नाही पण माझ्या मुलीने मला याविषयी आलेल्या प्रतिक्रीया दाखवल्या. लोकांनी ज्या भाषेत आपल्यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत ते पाहून मी व्यथित झालो आहे. माझ्या कुटुंबालाही या प्रतिक्रीया वाचताना त्रास होतो आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
4 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)