किरीट सोमय्या उमेदवारी प्रकरणावर उद्धव ठाकरेंची भूमिका !

मुंबई: किरीट सोमय्या उमेदवारी प्रकरणावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. किरीट सोमय्या यांना उमेदवारी न देण्यावरून शिवसेना कार्यकर्ते आक्रमक आहेत. ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास भारतीय जनता पक्षाला नुकसान होऊ शकते, असे मत सुनील राऊत यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. ‘ईशान्य मुंबईबाबत कोणीही परस्पर वादग्रस्त भूमिका जाहीरपणे मांडू नये. तर यापुढे फक्त नेमलेल्या प्रवक्त्यांनीच भूमिका मांडाव्यात,’ असे त्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.

“एकवेळ धनुष्य आणि कमळ यांच्या साठी एकत्र काम करेन पण ज्यांनी आमच्या (मातोश्री) मंदिरावर टीका केली त्यांना कसा पाठिंबा देणार? त्यामुळे किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात उभा राहणार असल्याचे सुनील राऊत म्हणाले होते” मात्र किरीट सोमय्या यांच्यासंदर्भात सुनील राऊत यांनी घेतलेली भूमिका अधिकृत नाही,’ असंही उद्धव ठाकरेंकडू स्पष्ट करण्यात आल्याचे समजते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here