पंढरपूरनंतर उद्धव ठाकरे वारणसीचा दौ-यावर

शिवसेनेही हिंदुत्वावर स्वार

मुंबई: आगामी निवडणुकीत भाजपसोबतच्या युतीबाबत साशंकता असताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा ऐरणीवर आणला. भाजपला राममंदिर निर्माणाच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येचा दौरा केला. आता राममंदिराच्या प्रश्नावर ठाकरे हे अयोध्येनंतर पंढरपूर आणि त्यापाठोपाठ वाराणसीचा दौरा करणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्वावर स्वार होत आपली हिंदू मतपेढी शाबूत ठेवण्याची रणनीती आखली आहे. त्यासाठी ठाकरे यांनी अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा उपस्थित केला. भाजपला राममंदिर निर्माणाच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात शरयू नदीच्या तीरावर सहकुटुंब आरती केली तसेच रामजन्मभूमीला भेट देऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. आता अयोध्येनंतर ठाकरे हे पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर आरती करणार आहेत. सोमवारी (दि. 24) पंढरपुरातील शक्तिप्रदर्शनासाठी शिवसेनेने जोरदार तयारी चालवली आहे.

पंढरपुरात राज्यभरातून पाच लाख शिसैनिक दाखल होतील. तर पंढरपूरसाठी मुंबईतून एक लाख शिवसैनिक येतील, असा अंदाज आहे. शक्तिप्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री कामाला लागले आहेत. पंढरपुरातील कार्यक्रमात ठाकरे हे राम मंदिराबाबत विठ्ठलाला साकडे घालणार आहेत. तसेच मुंबई ते पंढरपूर दरम्यान धावणा-या विठाई या एसटी सेवेला ठाकरे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

पंढरपूरची सभा यशस्वी केल्यानंतर ठाकरे वाराणसीचा दौरा करतील, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे हा दौरा नेमका कधी होतो? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)