बाळासाहेबांचा शब्द आणि बंदुकीची गोळी कधीही मागं फिरत नसे ! मात्र… – नितेश राणे

उद्धव ठाकरेंनी भाजपाची लाचारी पत्करून विश्वासार्हता गमावली

कोल्हापूर: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी पुन्हा शिवसेनेवर टीका केलीय. बाळासाहेबांचा शब्द आणि बंदुकीची गोळी कधीही मागे फिरायची नाही मात्र त्याच्या विरुद्धच उद्धव ठाकरे वागत आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची विश्वासअर्हता गामावलेली आहे. याची शिक्षा महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरे यांना देतील असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसंच, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मोठ्या ताकतीने निवडणूक लढवणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाच जागा लढवणार असल्याच राणे यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ यापूर्वीच नारायण राणे यांनी जाहीर केला आहे तर उर्वरित चार मतदार संघ हे लवकरच राणे साहेब जाहीर करतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या विषयी बोलण्यासारखं काहीच राहिलेले नाही त्यांची विश्वासाहर्ता पूर्णतः संपलेली आहे असा आरोपही त्यांनी केला. बाळासाहेबांचा शब्द आणि बंदुकीची गोळी कधीही मागे फिरायची नाही परंतु त्याच्या विरुद्धच उद्धव ठाकरे वागत आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपाची लाचारी पत्करून विश्वासार्हता गमावलेली असल्याने महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरे यांना शिक्षा दिल असा टोलाही त्यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)