उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात महालक्ष्मी चरणी

कोल्हापूर – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुर येथे करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर राज्यातील युतीच्या प्रचाराचा आरंभ करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेनेचे आदित्य ठाकरे यांनी देवीचे दर्शन घेतेले. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे हे युतीच्या प्रचाराचा शुभारंभ नेहमी कोल्हापुरातून करायचे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही यावेळी युतीचा प्रचार कोल्हापुरातून सुरू करावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर मध्ये उपस्थित राहत भाजपा-शिवसेना युतीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)