‘उदयकाळ फाउंडेशन’कडून वंचित घटकातील मुलांना दिवाळी फराळ वाटप

पुणे – शहरातील वारजे येथील ममत्व केंद्र येथील वंचित मुले ही निवासी असतात. दिवाळी सण आंनद व उत्सवाचा तसेच गोड पदार्थ करुन एकमेकांना बरोबर साजरा होणार सण असतो. समाजातील वंचित घटकातील मुले यांना देखील दिवाळी सणा निमित्ताने गोड पदार्थ मिळावेत यासाठी उदयकाळ फाउंडेशन मधील सदस्यांनी ममत्व केंद्र येथील मुलांना दिवाळी फराळ, उटणे व ग्रीटिंग कार्ड भेट देऊन दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या.

समाजात असे अनेक व्यक्ती दिसतात जे दिवाळीचा आनंदाचा सण साजरा करण्यापासून वंचित असतात. त्यांच्या जीवनात देखील दिवाळी आनंदाने साजरी होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेता उदयकाळ फाउंडेशनतर्फे ममत्व केंद्रातील वंचित घटकातील मुलांना दिवाळी फराळ वाटप केल्याचे फाउंडेशनचे सचिव मयूर बागुल यांनी सांगितले.

सदरील कार्यक्रम प्रसंगी संस्थेतील सदस्यांनी ममत्व केंद्राची माहिती दिली. मुलांना दिवाळी फराळ वाटप करतांना नरेंद्र साखरे, पूजा साखरे, समाजसेविका प्रभावती बागुल, केतकी पवार हे उपस्थित होते. यावेळी संस्थेतील विद्यार्थ्यांनी आपला परिचय व दिवाळीतील संकल्प सांगितला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
6 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)