उदयनराजे, रणजितसिंह विजयी होणार

विकीपिडीयाने केला अप्रत्यक्ष संकेत : वंचित बहुजन आघाडी तिसऱ्या स्थानी
सम्राट गायकवाड

सातारा – सातारा व माढा लोकसभा मतदारसंघातील यंदाची लढत जोरदार झाल्यानंतर विजयी कोण होणार, असा प्रश्‍न सर्वांनाच पडला होता. आता या प्रश्‍नाचे अप्रत्यक्ष उत्तर विकीपिडीया संकेतस्थळाने दिले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून खा. उदयनराजे तर माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह ना. निंबाळकर विजयी होणार, असा निष्कर्ष विकीपिडीयाने काढला आहे. 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीपुर्वी विकीपिडीयाने तयार केलेल्या रकान्यात साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमदेवार खा. उदयनराजे व माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह ना. निंबाळकर यांना पहिले स्थान दिले आहे.

इंटरनेटच्या जगात विकीपिडीया संकेतस्थळ अग्रस्थानी आहे. संकेतस्थळावर जगातील सर्व विषयाची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे इंटरनेटवर कोणत्या ही विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी सर्च करताच विकीपिडीयाचा पहिला पर्याय सुचविला जातो. विकीपिडीयावर देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघात सन 2014 पर्यंत झालेल्या  निवडणूकांची व उमेदवारांना प्राप्त मतांची विस्तृत माहिती उपलब्ध आहे. माहितीच्या रकान्यामध्ये विजयी उमेदवाराला पहिले स्थान दिले असून प्राप्त मतांनुसार उर्वरित उमेदवारांची क्रमाने माहिती नमूद केली आहे. विकीपिडीयाने 23 मे रोजी लागणाऱ्या निकालाच्या दृष्टीने तयारीला सुरूवात केली असल्याचे दिसून येते. त्यामध्ये, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मतयार करण्यात आलेल्या रकान्यात खा.उदयनराजेंचे नाव पहिल्या स्थानावर नमूद केले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी तयार करण्यात आलेल्या रकान्यात रणजितसिंह ना.निंबाळकर यांचे ही नाव क्रमांक पहिल्या स्थानावर नमूद केले आहे. साताऱ्यातून महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील तर माढ्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना दुसरे स्थान दिले आहे. दोन्ही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना तिसरे स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, 23 मे रोजी फेरीनिहाय मतदान जाहीर होताच उमेदवारांच्या नावासमोर प्राप्त मतांची नमूद करण्याची तयारी विकीपिडीयाने केली असल्याचे दिसून येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)