उदयनराजे-रामराजे वाद शिगेला; शरद पवारांची मध्यस्थी फोल

सातारा – नीरा-देवघर पाणी प्रश्नावरून खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. या प्रकरणी मध्यस्थी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासोबत मुंबई येथे एक बैठक आयोजित केली होती. मात्र शरद पवारांद्वारा आयोजित करण्यात आलेली ही बैठक देखील दोन्ही राजेंमधला वाद मिटवण्यावण्यामध्ये अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

शरद पवारांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या या बैठकीतून खासदार उदयनराजे भोसले चिडून बाहेर पडल्याने ही बैठक फोल ठरली असून संतापलेल्या उदयनराजे यांनी बैठकीमधून बाहेर पडताच थेट पत्रकारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘रामराजेंनी मला ‘स्वयंघोषीत’ छत्रपती असं संबोधलं मात्र मी स्वयंघोषीत छत्रपती नाही. लोकांनी मला त्यांच्या मनात छत्रपतींचं स्थान दिलं आहे. मी छत्रपतींच्या घराण्याचा कधीच वैयक्तीक स्वार्थासाठी वापर केला नाही. रामराजेंनी मला चक्रम म्हणंत माझ्यावर टीका केली, हो मी चक्रम आहे. लोकांवर अन्याय होत असेल तर मी चक्रम होतो. मला अन्याय सहन होत नाही त्यामुळे मी स्वपक्षीयांवरही बोलतो त्याला घरचा आहेरही म्हटलं जातं.’.

तत्पूर्वी, रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसलेंची तुलना पिसाळलेल्या कुत्र्याशी केली होती. या वक्तव्याचा निषेध करत उदयनराजे भोसलेंच्या समर्थकांनी रामराजे नाईक निंबाळकरांचा पुतळा जाळला होता.

दरम्यान, याबाबत बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल स्पष्ट केले होते की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन “खासदार उदयनराजेंना तुम्ही सांभाळणार असाल तर आम्हाला पक्षातून बाहेर पडण्याची परवानगी द्या,’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here