सातारा शहरात उदयनराजेंचीच हवा

संग्रहित छायाचित्र

सातारा – लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या मतदाना दरम्यान सातारा शहरात खा. उदयनराजेंची हवा असल्याचे दिसून आले. नगरसेवकांसह समर्थकांनी अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठी ताकद पणाला लावली होती. त्याचबरोबर आ. शिवेंद्रसिंहराजेच्या मोजक्‍या समर्थकांसह आजी-माजी नगरसेवक देखील मतदानाच्या प्रक्रियेत सक्रिय झाल्याचे दिसून आले.

खा. उदयनराजे समर्थकांनी सोमवारी रात्रीपासूनच अधिकाधिक मतदान होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले होते. मंगळवारी सकाळी शहरातील सर्व मतदान केंद्रांवर खा. उदयनराजेंचे पोलींग बुथ उभारले होते. त्याचबरोबर मतदारांना आणण्यासाठी रिक्षासह इतर वाहनांची आवर्जुन सुविधा उपलब्ध केली होती. त्याचबरोबर पोलींग बुथवरील कार्यकर्त्यांसाठी नाष्ट्याची सोय देखील प्रमुख नेत्यांनी केली होती. तसेच प्रत्येक मतदान केंद्राच्या दोन्ही बाजूला खा. उदयनराजेंच्या गटाने पोलींग बुथ उभारल्याने मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांची आणि स्थानिक नेत्यांची चर्चा देखील होताना दिसून येत होती. तर दुसऱ्या बाजूला महायुतीतील भाजप-सेनेसह इतर पक्षांचे पदाधिकारी फारसे सक्रिय असल्याचे दिसून आले नाही. परिणामी शहरातील मतदारांवर खा. उदयनराजेंचा प्रभाव कायम राहिल्याचे प्रकर्षाने जाणवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)